शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
दिवा पेटवणे, पाण्याची साखर करणे, दुधाची बाटली तोंडात टाकून कानातून काढणे, त्रिशूल जिभेत टाकने, हातातून सोन्याची साखळी काढणे, ंिलंबू, मिरची-बिब्बे यांचे प्रात्यक्षिक सादर करून माणसाच्या मनातील भुताची संकल्पना खोटी आहे म्हणून चमत्कार व बुवाबाजीवर विश्वास न ठेवता सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन प्रबोधन अंनिसचे जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले यांनी केले.
शहरातील श्री विवेकानंद सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणीच्या वतीने या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. अंनिसचे जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले यांनी चमत्कार व बुवाबाजी या संबंधाने समाजात अध्यात्मातून चालत असलेल्या बुवाबाजीवर प्रहार करून स्वर्ग-नरक, पाप -पुण्य या सर्व थोतांड कल्पनेला दूर केल्याशिवाय समजाचे शोषण थांबणार नाही असे परखड मत व्यक्त केले आहे.
या प्रबोधनपर कार्यक्रमात अंनिसचे उत्तरेश्वर बिराजदार यांनी भानामती व करनी हे मानसिक आजार असतात त्यामुळे आपण असे प्रकार घडल्यास अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. प्रा.डॉ .मारोती गायकवाड यांनी महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणल्याशिवाय सामाजिक परिवर्तन होणार नसून शिकलेल्या व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, असे सांगितले. प्रास्ताविक अंनिसचे देविदास सांगवे यांनी केले. आभार योगेश मोरखंडे यांनी मानले. सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष असिफ उजेडे हे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महांिलंग चाकोते हे होते. रतन शिवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मंडळाचे असिफ उजेडे, सोनू चाकोते, कृष्णा सावंत, शिवाजी मुदाळे, गणेश सलगरे, मुकींद गोणे, विरभद्र गांजुरे, संभाजी सावंत, शिवप्रसाद रेकुळगे, शिवानंद डोंगरे आदीनी परिश्रम घेतले.