22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरबेपत्ता मुलीस शोधण्यात औसा पोलिसांना यश

बेपत्ता मुलीस शोधण्यात औसा पोलिसांना यश

लातूर : प्रतिनिधी
औसा पोलिस ठाणे येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित पोलिस स्टेशनचे पोलिस नमूद मुलीचा शोध घेत होते; परंतु ती सापडत नव्हती. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडून सदर मुलींचा शोध घेण्यासाठी औसा पोलिसांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. या बेपत्ता मुलीचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड व त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुलीसंदर्भात खूप काही उपयुक्त माहिती नसतानाही गोपनिय व सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींचा शोध घेऊन ती लातूर ते उमरगा बसने प्रवास करीत असताना बसमध्ये मिळून आली. या बेपत्ता मुलीचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर तिच्या सोबत मिळून आलेल्या आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड, महिला पोलिस उपनिरीक्षक राठोड, पोलिस अमलदार भुरे, भंडे, वाडकर, मंदाडे सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR