15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरबेमोसमी पावसाचा फटका; पालेभाज्यांची आवक घटली

बेमोसमी पावसाचा फटका; पालेभाज्यांची आवक घटली

लातूर : प्रतिनिधी

डिसेंबरच्या पहील्या आठवड्या पडलेल्या बेमोसमी पावसाने राज्यभरातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात येणा-या पालेभाज्यांची आवक कमी झाली असून घाउक बाजारात भाजीपाल्यांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून भाज्यांच्या दरामध्ये १० ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, बेमोसमी पावसाने चांगलंच झोडपून काढल्याने शेतक-यांच्या तूर, हरभरा, फळबागांसहित पालेभाज्यांच्या पिकांनाही फटका बसला आहे.

या नुकसानीमुळे लातूर बाजार समीतीमध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने तूलनेत कमी झाली आहे. त्यामुळे घाउक बाजारात सध्या भाज्यांच्या दरामध्ये वाढ होण्यास सूरूवात झाली असल्याचे व्यापारी सागत आहेत. आवकाळी पावसामुळे पालेभाज्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लातूर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने घाउक बाजारात भाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. घाउक मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये प्रतिकिलो प्रमाने विक्री केली जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन २ ते ३ टन भाजीपाला विक्रीसाठी येत असतो.आवकाळी पावसामुळे शनिवारी ९५२ क्ंिव्टल भाजीपाल्याची आवक झाली आहे.

घाऊक बाजारात २० ते ३० रुपये किलो दराने विकल्या जाणा-या पालेभाज्यांचे दर ५० ते ७० रुपये झाले आहेत. गेल्या आठवडयाच्या तूलनेत ही आवक १० टक्यानी घटली असल्याची माहीती व्यापारी वर्गानी एकमतशी बोलताना दिली आहे. लातूरच्या बाजारपेठेत येणा-या पालेभाज्यांची आवक अवकाळी पावसामुळे सरासरीच्या तूलनेत घटलेली दिसून आली आहे. तर, फळभाज्यांची आवक समाधान कारक असल्याचे पहावयास मिळाले. लातूर मंडई बाजारात १० किलो बॅगच्या सर्वसाधारण भावाप्रमाणे वांगे २०० रुपये, दोडका २४० रुपये, भेंडी ४०० रुपये, पत्ता गोभी ६० रुपये, फुल गोभी ८० रुपये, गावरान टमाटे १२० रुपये, वैशाली टमाटे १४० रुपये, गवार ४०० रुपये, शेपू १५० रुपये, पालक १२० रुपये, गाजर १५० रुपये, भोपळा १५० रुपये, कोथींबीर १५० रुपये, हिरवी मिरची १४० रुपये, वैशाली मिरची २०० रुपये, वरना २०० रुपये, वटाना ३०० रुपये, शेवगा ६०० रुपये, मेथी १००० रुपये, कांदापात ६०० रुपये, लिंबू १५० रुपये, काडकी २०० रुपये, कारले ३०० रुपये या प्रमाणे लातूर मंडईत दररोज बाजारभाव काडला जातो. तर किरकोळ बाजारात व्यापारी पालेभाज्यानां अदिकचा दर देवून त्याची विक्री करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR