28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरबेलकुंड-देवताळा-लोहटा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

बेलकुंड-देवताळा-लोहटा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

औसा : प्रतिनिधी
गेल्या चाळीस वर्षांपूर्वी तयार झालेल्या बेलकुंड-देवताळा- लोहटा रस्ते कामांसाठी पुन्हा निधी उपलब्ध न झाल्याने हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यावर डागडुजीची कामे झाले मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा कामांसाठी मात्र निधी उपलब्ध झाला नाही लातूर व धाराशिव या दोन्ह जिल्ह्यांना जोडणा-या या रस्त्याचा थेट संबंध वीस ते पंचवीस गावातील वाहतुकीशी निगडित आहे. आ अभिमन्यू पवार यांनी रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा कामांसाठी तब्बल २१ कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
औसा तालुक्यातील केंद्रीय मार्ग निधीतून बेलकुंड-देवताळा-लोहटा ते जिल्हा हद्द या १९.५० किलोमीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामांसाठी एकूण २१ कोटीं रुपयांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा काम पूर्ण केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा कामांसाठी निधी आवश्यक असताना आ. अभिमन्यू पवार यांनी यासाठी प्रयत्न केले असून या रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. दोन जिल्ह्यांना जोडणा-या बेलकुंड- देवताळा माकणी या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वाहतूकीच्या दुष्टीने हा महामार्ग अरुंद झाला होता. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठीही अडचणी निर्माण होत होत्या. यामध्ये गत दोन वर्षापासून झालेल्या अतिवृष्टीने तर यामध्ये आणखी भर पडून ठिकठिकाणी रस्ता उखडून निघाला आहे.
यामध्ये रस्त्यावरून प्रवाशी वाहतुकीसह दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्याला ऊसाची वाहतूक होण्यासाठी प्रमुख रहदारीचा हा रस्ता मानला जातो. या मार्गावरून होणारी वाहतूक बघता या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा काम होणे आवश्यक असताना निधी अभावी या रस्त्याचे काम होऊ शकले नव्हते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR