25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरबैलपोळ्याचे साहित्य दीडपटीने महागले

बैलपोळ्याचे साहित्य दीडपटीने महागले

लातूर : प्रतिनिधी
भारत हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळयाचे महत्व अजूनही कायम आहे. शेतक-­य्ाांसोबत वर्षभर शेतात राबणा-या बैलांचा एकमेव सण बैलपोळा हा अवघ्या एक दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा बैल पोळ्याया साहित्या दीड पटीने वाढ झाल्याचे व्यापा-यांनी सांगीतले.
बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्याच्या दिवशी मोठया उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त  करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रासह, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमाभागात सुद्धा हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा असलेला शेतक-यांच्या सर्जा-राजाचा सण पोळा हा सोमवारी म्हणजे २ सप्टेंबरला मोठया उत्सवात साजरा होणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी शहरातील बाजारपेठ फुलली आहे.
बाजारपेठेत विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. वर्षभर आपल्याला साथ देणा-या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा दरवर्षी मोठया प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करतो. या सणाच्या पार्शवभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणारे दोर, झुला, नात, मोरखी, गोंडा, भोरकडी, पायातले घुंगरु, बासींग, कंडे, फुलांच्या माळा, कंडी, रंग, यासारखे १५० ते २०० विविध प्रकाराचे साहित्य बाजारात ५० ते २००० रुपये दराने विक्रीसाठी दाखल झाले आहे. लातूरच्या बाजार पेठेत बैलांच्या साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. या सणाच्या पार्शवभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणारे दोर, झुला, नात, मोरखी, गोंडा, भोरकडी, कडी, गेठा, रंग, लटी यासारखे विविध साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
त्याचबरोबर पैंजण, घंटी, कड्या, घुंगरु, शेल्पा आदी पितळाच्या वस्तुंसह विक्री बाजारात होत आहेत. त्याचबरोबर बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, विविध प्रकारचे कंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी कलर आदि सजावटीचे साहित्य मोठया प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. बैलाच्या गळयात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात.  सुती धाग्यात विणलेल्या चंगाळयांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात. वर्षभर शेतात राबणा-या बैलाला पोळयाच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR