लातूर : प्रतिनिधी
ब्युटी पेजन्टच्या वतीने येथील कार्निवल रिसॉर्टमध्ये दि. १९ जानेवारी रोजी १६ ते ७० वर्षे वयोगटातील महिलांसाठी आयोजित शोमध्ये शिवानी बंडे विजेत्या ठरल्या. स्पर्धेस महीलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. ३५ स्पर्धक अंतिम फेरीस पात्र ठरले. अंतिम फेरीत शिवानी बंडे, अपूर्वा पिनाटे, डॉ. राजश्री सावंत तर २ रा व ३ रा क्रमांक रितिका कटके, सायली रंदाले, डॉ. मंजुषा कुलकर्णी, सारिका मंत्री, निशा कोरे, राजश्री इटकर यांनी पटकावला. या कार्यक्रमाचे आयोजन समीर बजाज यांनी केले होते. संयोजन आंचल अग्रवाल, मुंदडा आणि डॉ. शनाया बजाज यांचे होते. ज्यूरीची धूरा माधुरी मकनिकर, डॉ. प्रचिती पुंडे, सुप्रिया वायगावकर यांनी पार पाडली. ड्रेस डिझायनर म्हणून रुपाली बोराडे, वसुधा शिंदे, मनीषा बिरादार, अमृता देबावांर यांनी काम पाहिले.