23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रभरधाव कारने ४ जणांना उडवले

भरधाव कारने ४ जणांना उडवले

नागपूर : प्रतिनिधी
नागपुरात हिट अँड रनची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील केडीके कॉलेज चौकात भरधाव कारने चार लोकांना उडवल्याची घटना घडली आहे. भरधाव कार टर्न घेताना रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडीओही समोर आला आहे.

गेल्या तीन आठवड्यांत अपघाताची ही तिसरी घटना येथे घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR