23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रभरधाव ट्रकने १०० मेंढ्यांना चिरडले

भरधाव ट्रकने १०० मेंढ्यांना चिरडले

नंदुरबार : प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. या घटनेत भरधाव ट्रकने रस्त्याने जाणा-या मेंढ्यांना चिरडले. या घटनेत शंभरहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढपाळ विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात मेंढ्या घेऊन निघाले होते.

मेंढपाळ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाने जात असताना आंध्र प्रदेश राज्यातील असलेला भरधाव वेगातील ट्रक मागून मेंढ्यांमध्ये घुसला. यात शंभरहून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्या आहेत. त्यात काही गर्भवती मेंढ्या देखील होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR