23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे डबल इंजिन सरकार गुन्हेगारांना वाचवतेय

भाजपचे डबल इंजिन सरकार गुन्हेगारांना वाचवतेय

काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रमुख अलका लांबा

मुंबई : काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रमुख अलका लांबा यांनी बलात्कार करणा-या नराधमांना नपुंसक करण्याच्या कायद्यावर मोठे वक्तव्य केले. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षांनी महिला विशेषत: मुलींवरील वाढणा-या अत्याचारांवर संताप व्यक्त केला. माध्यमांसोबत संवाद साधताना अलका लांबा म्हणाल्या, ‘भाजपचे डबल इंजिन सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारने अल्पवयीन पीडितांच्या बलात्काराच्या प्रकरणांची दोन ते तीन महिन्यांत सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करावीत.’

पुढे अलका लांबा म्हणाल्या, ‘दोषींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, गुन्हेगारांना नपुंसक बनवण्यासाठी विशेष कायदा केला पाहिजे. जोपर्यंत गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होणार नाही, तोपर्यंत गुन्हे घडतच राहतील’ असे म्हणत काँग्रेस कायम बलात्कारपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल, तर भाजपच्या डोळ्यांमध्ये महिलांसाठी खोटे अश्रू आहेत, असे म्हणत लांबा यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत, असे असताना देखील ते मुक्तपणे फिरत आहेत. तर पीडित महिला सतत न्यायाची मागणी करत आहेत. एवढेच नाही तर, आरोपीला अटक करण्यात आली असली तरी ब्रिजभूषण यांना व्हीआयपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा दावा देखील लांबा यांनी केला.

सांगायचे झाले तर, तृणमूल काँग्रेसचे वादग्रस्त नेते शेख शाहजहान यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी २८ फेब्रुवारीच्या रात्री अटक केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शेख शाहजहान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR