22.4 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपने स्वत:चा विक्रम यंदा मोडला

भाजपने स्वत:चा विक्रम यंदा मोडला

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवावर मात करून ‘एक है तो सेफ है’ आणि ‘कटेंगे तो बटेंगे’ यासह महायुतीने २०० पारचा नारा दिला होता. याचाच थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला.

महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली असून दरम्यान, महाराष्ट्रात २०१९ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट यंदा आल्याचे पाहायला मिळाली. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळाले. कारण यंदा भाजपने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये भाजप १३३ जागांच्याही पुढे आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता त्याही पुढे जात भाजप १३३ जागांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात भाजप-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR