22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार

भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार

कल्याण : प्रतिनिधी
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला असल्याची घटना घडली.

महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची इथे खूप मोठी ताकद आहे. त्याच तोडीची ताकद भाजपचीही आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपनेही तयारी केली आहे. यावरून भाजप आणि ठाकरे गटात सातत्याने दावे-प्रतिदावे, वाद सुरू असताना भाजप आमदार आणि शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणची जागा भाजपला मिळावी, यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. या मुद्यावरून शिंदे गटावर वेळोवेळी टीकास्त्रही सोडले आहे. यावरून शिंदे गट आणि आमदार गायकवाड यांच्यातील वाद नेहमीच चव्हाट्यावर येत होता. त्यातच आज थेट पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार झाल्याचे समोर आले असून, हा गोळीबार आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण-उल्हासनगरचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर केला आहे. त्यामुळे ते जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे येथे तणावाची स्थिती असून, भाजप-शिंदे गटातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR