22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरभाजीपाल्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

भाजीपाल्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

सोलापूर : सतत बदलणारे वातावरण गेल्या आठवड्यात सर्वसाधारण १५ ते २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी फूलकोबी किरकोळ बाजारात ३० रुपये भावाने घ्यावी लागत आहे. सांबार ठोक बाजारातच २५ रुपये किलो झाला असून किरकोळ विक्रेते चक्क ५० रुपयात विकत आहेत. दहा दिवसांआधी किरकोळमध्ये १० रुपये किलो विकले जाणारे टोमॅटो ४० रुपयांवर विक्री होत आहेत.

टोमॅटो गवार ६०-८० ४०-५० बटाटा ३०-३५ ६०-८० २२०-२६० ८०-१०० ६०-८० ३०-४० रुपये पेंडी ३०-४० रुपये पेंडी लसूण काकडी शेवगा मेथी कोथिंबीर असे कीलोमागे भाजांचे दर आहेत. लसूण महाग असताना आता पालेभाज्याही महाग झालेल्या आहेत.फोडणीसाठी लसणाऐवजी विविधकंपन्यांच्या तयार लसूण पेस्टचा पर्याय म्हणूनवापर होतो. तयार पेस्ट पाच ते दहारूपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत;मात्र कोथिबीर, मेथी, टोमॅटो यासाठीकाय करावे. असा प्रश्न गृहीणींपुढे आहे.

अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अत्यंत नुकसान झाल्याने बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली. पाऊस थांबल्यानंतर तापमान पुन्हा चाळिशीपार गेले. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजार समितीत भाज्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत.

भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरातही वाढ झाली असल्याने भाजी खरेदी करताना विचार करावा लागतो आहे. गेल्या दोन महिन्यांत भाजीपाल्यांचे दर वाढल्याने गृहीणींचे मासिक बजेटही बिघडले आहे. तसेच गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या लहरीपणाचा पिकांवर जसा परिणाम झाला, त्याचप्रमाणे भाजीपाल्यांवर झालेला आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली असून, त्याचे परिणाम दरांवरही झाल्याचे बघायला मिळत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगी यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे. यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. मेथी व कोथिंबीर ४० ते ५० रुपये पेंडी तर हिरव्या मिरचीचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत गेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR