16.5 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय तटरक्षक दलाकडून ७ भारतीयांची सुटका

भारतीय तटरक्षक दलाकडून ७ भारतीयांची सुटका

२ तास सुरु होता पाकच्या जहाजाचा पाठलाग पाक सिमेजवळ मच्छिमारांना पकडले होते

ओखा : भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजावरुन दोन तासांच्या पाठलागानंतर सात भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या पीएमएस नुसरत या जहाजावरुन मच्छिमारांना बळजबरीने अटक करून सीमेवर नेले जात होते. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळून या मच्छिमारांना पकडण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग करून भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.

रविवारी पाकिस्तानी जहाज भारतीय मच्छिमारांना अटक करण्यासाठी पाकिस्तान-भारत सागरी सीमारेषेजवळ पोहोचले होते. मात्र तिथे तैनात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम नावाच्या जहाजाने तातडीने कारवाई करत पाकिस्तानी जहाजाचा दोन तास पाठलाग केला आणि मच्छिमारांची सुटका केली.

संरक्षण अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पीएमएस नुसरत जहाज हे कालभैरव या मासेमारीच्या बोटीतील मच्छिमारांना घेण्यासाठी भारतीय जलक्षेत्रात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने तातडीने प्रत्युत्तर देत मच्छिमारांची सुटका केली. रविवारी दुपारी ३:३० वाजता, भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम जहाजावर मदतीसाठी फोन आला होता. कालभैरव या भारतीय मासेमारी नौकेतून हा कॉल आला होता. कालभैरव जहाज नो-फिशिंग झोनजवळ मासेमारी करत होते.

७ जणांना पाकमध्ये नेण्याचा होता डाव
पाकिस्तानी जहाजाने त्यांना पकडून ठेवले होते. कालभैरववरच्या सात मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेण्याचा पीएमएस नुसरतचा डाव होता. पण अग्रीमने पूर्ण वेगाने जाऊन पाकिस्तानी जहाज नुसरतला रोखले. दोन तास समुद्रात शर्यत सुरू होती. यानंतर पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छिमारांना सोडण्यास सांगण्यात आले. शेवटी धमक्या आणि समजूतदारपणा कामी आला. पण काळभैरव बोट तुटली. त्यामुळे ती समुद्रातच बुडाली. यानंतर अग्रीम जहाज सोमवारी गुजरातमधील ओखा बंदरात मच्छिमारांसह परतले.

चौकशी सुरू
या प्रकरणी आता गुप्तचर संस्था, राज्य पोलिस आणि तटरक्षक दल त्या मच्छिमारांची संयुक्तपणे चौकशी करत आहेत. याशिवाय समुद्रात नेमके काय झाले याचाही तपास केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR