18.4 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांनी धुडकावली राज्यसभेची ऑफर

भुजबळांनी धुडकावली राज्यसभेची ऑफर

नागपूर : प्रतिनिधी
भुजबळ यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना राज्यसभेची ऑफरही दिली. पण, भुजबळांनी ती ऑफर नाकारल्याचती माहिती आहे.
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यावर छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सात आठ दिवसांपूर्वी म्हटलं की राज्यसभेवर जा, मला राज्यसभेवर जायचं होतं पण कधी ते पूर्वी साता-याला जी जागा दिली होती तेव्हा, त्यावेळी त्यांनी ती दिली नाही. तेव्हा सांगितलं की तुम्ही लढायला हवं, तुम्ही लढलात तर पक्षाला अधिक पाठबळ मिळेल. मी ठीक आहे म्हटलं आणि लढलो, निवडून आलो .

मी त्यांना सांगितलं की मी ताबडतोड जाऊ शकत नाही. तो माझ्या मतदारांसोबत विश्वासघात ठरेल. कारण, राज्यसभेवर जायचे तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल, ते माझ्या लोकांसाठी दु:खदायक ठरेल. ज्यांनी मला प्रेम दिले त्या मतदारसंघात मी असे वागणार नाही , असं भुजबळ म्हणाले. तसेच, जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की तुम्ही ही राज्यसभेची ऑफर स्वीकारणार नाही का, त्यावर त्यांनी हातवारे करत नाही असा सूचक इशारा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR