19.1 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeलातूरभूजल पातळी २.२५ मिटरने वाढली

भूजल पातळी २.२५ मिटरने वाढली

लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी पावसाळयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वरिष्ठ भूजल विभागाच्यावतीने सप्टेंबर अखेर भूजल पातळीची तपासणी केली आहे. या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत २.२५ मिटरने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर/ऑक्टोबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर अखेर जिल्हयातील भूजल पातळीची तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या  सरासरीच्या तुलनेत २.२५ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले  आहे.
लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो यावर्षी ८६७.४ मिमी पाऊस झाला आहे. यात लातूर तालुक्यात ८०९.६ मिमी, औसा तालुक्यात ९२१.९ मिमी, अहमदपूर तालुक्यात १०२२.० मिमी, निलंगा तालुक्यात ८६६.६ मिमी, उदगीर तालुक्यात ८३२.८ मिमी, चाकूर तालुक्यात ८५९.५ मिमी, रेणापूर तालुक्यात ९२८.१ मिमी, देवणी तालुक्यात ७६५.४ मिमी, शिरूर अनंतपाळ ७१६.२ मिमी, तर जळकोट तालुक्यात ८५१.३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुबलक पाणी साठा तयार झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR