लातूर : सिद्धेश्वर दाताळ
नवीन वर्षातील पहिला सण असणा-या मकरसंक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत महिला वर्गानी ऐकच गर्दी केली आहे. त्यातच, शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने खरेदीसाठी महिलांची एकच झुबंड उडालले पाहावयास मिळाली. मकरसंक्रांतीचा सण सोमवारी असल्याने खरेदीसाठी महिला वर्ग बाजारात दाखल झाला आहे. मकरसंक्रांती या दिवशी तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून रुढ आहे. मकरसंक्रांती निमित्ताने बाजारात सुगडी त्याचबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, बांगडया बाजारामध्ये विक्रीला आल्या आहेत. यांसह तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, रेवडी, हलवा या सारखे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.
गतवर्षाच्या तूलनेत यंदा तीळगूळ, रेवडी तिळाच्या वडया यांची मागणी अधीक असल्याचे व्यापारी सोहम गोरे यांनी एकमतशी बोलताना दिली. शहरातील बाजारपेठेत तिळाचे लाडू १०० ते १५० रुपये प्रती किलो, गुळाची रेवडी २० ते ३० रुपय पाव किलो, हलवा २० ते ३० रुपये पाव किलो असे भाव असल्याचे विक्रेते अजिम पठाण यांनी सांगितले. तर तीळ ५० ते ६० रुपये पाव किलो आणि गुळ ४० ते ५५ रुपये किलो असा दर असल्याचे किराणा दुकानदार राजेंद्र शिंदे यांनी सागीतले. त्याचबरोबर हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरातील गंजगोलाई बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. त्यातबरोबर चमचे, वाटी, सोप केस, डब्बे, कुंकवाचा कंरडा यांसह रोजच्या वापरात येणा-या वस्तूं खरेदीवर महिला वर्गाने भर दिला आहे. तर अलीकडच्या काही वर्षापासून झाडांची छोटी रोप वाण म्हणून देण्याचे प्रमाणही वाढल्याचे विक्रित्यांनी सांगितले.
सुवासिनींचा मकरसंक्रात हा महत्त्वाचा सण असल्याने या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे वाण घेण्यासाठी व तिळगुळ वाटण्यासाठी खणाची (सुगडी) आवश्यकता असल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्याचबरोबर संक्रांतीला विशेष मान असणा-या हलव्याच्या दागन्यिांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके आदी दागिन्यासह विविध वस्तू बाजारत उपलब्ध झाल्या आहेत.