17.7 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरमतदार जागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम

मतदार जागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदार जागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी या मोहिमेला प्रारंभ झाला.
‘मतदान माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच’ असे नमूद केलेल्या फलकावर अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या नागरिकांनी स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा निर्धार करावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे आणि प्रियांका आयरे, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही यावेळी फलकावर स्वाक्षरी करुन मोहिमेत सहभाग नोंदविला.
लातूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सर्व यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मतदानात किमान डिस्टींगशन गाठण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे म्हणाल्या. मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघात विविध महाविद्यालये, विविध सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.  स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. मतदारांचा उत्साह वाढविण्याकरीताही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. नाविण्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात, निर्भयपणे साजरा करण्याकरीता प्रशासन सज्ज झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR