बीड : प्रतिनिधी
ओबीसी आणि मराठ्यांच्या मतांसाठी राज्याची कायदा- सुव्यवस्था बिघडवू नका. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कायदा-सुव्यवस्था सांभाळावी, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ओबीसी आणि मराठ्यांची मते या सरकारला पाहिजेत म्हणून ओबीसी आंदोलन आमच्या बरोबरीने आणून बसवले आहे. त्यानंतर रोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यात पोलिस त्यांचं काम करतायेत. मात्र, केवळ मतांच्या राजकारणासाठी राज्याची कायदा-व्यवस्था बिघडू देऊ नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले.
मी समाजासाठी काम करत आहे. मला सगळा समाज सारखा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आमच्या गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करू नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले. आमचा संयम ढळू देऊ नका.
काही लोक काड्या लावण्यासाठी ठेवलेत
विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक व्हावे हे विनायक मेटे यांचे स्वप्न होते, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पण राजकारणी लोकांना महापुरुष मतांपुरतेच हवे असतात असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी काही लोक काड्या लावण्यासाठी ठेवल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आम्ही त्यांना दोष देत नाही, कारण सगळ्या गोष्टीचे मुकादम हे भुजबळ असल्याचे जरांगे म्हणाले. ओबीसी आणि मराठा बांधवांचे भुजबळ वाटोळे करत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
माझ्या गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होऊ देऊ नका असे मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका असेही जरांगे पाटील म्हणाले. बीडचा पालकमंत्री तुमचा म्हणून मराठ्यांवर अन्याय करता का? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.