26.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeराष्ट्रीयमदरशात सातवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

मदरशात सातवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

मौलानाला १० वर्षांचा कारावास

कानपूर : येथून गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी बातमी समोर आली असून येथील मदरशात फॉर्म भरण्याच्या बहाण्याने सातवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणा-या मौलानाला विशेष न्यायाधीश सुरेंद्र पाल सिंग यांनी शिक्षा सुनावली आहे. तर, दोन शिक्षकांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

न्यायालयाने मौलानाला १० वर्षांचा कारावास आणि ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, पीडितेला दंडातून ५० हजार रुपये मिळतील. विशेष सरकारी वकील चंद्रकांत शर्मा यांनी सांगितले की, कानपूर देहाटमधील अकबरपूर येथे राहणारे मोहम्मद जावेद गुलशन हे फातिमा मदरशात मौलाना म्हणून कार्यरत होते. ९ जून २०१९ रोजी त्याने फॉर्म भरण्याच्या बहाण्याने अलिमा कोर्स करणा-या विद्यार्थिनीला घरातून मदरशात नेले होते. तिथे मौलानाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मौलाना मोहम्मद जावेद, शिक्षक अब्दा इस्लाम आणि शीबा उर्फ ​​शिफा यांच्या विरोधात नौबस्ता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात पाठवले होते.

दरम्यान, पीडितेसह आठ साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने मौलानाला शिक्षा सुनावली. तर, पुराव्याअभावी दोन्ही शिक्षकांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील शर्मा यांनी सांगितले की फॉरेन्सिक तपासणी अहवालात आरोपीच्या लुंगी आणि पीडितेच्या कपड्यांमध्ये मानवी वीर्य आणि रक्त आढळले. वैद्यकीय अहवालातही याची पुष्टी झाली आहे. त्या आधारे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR