24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeलातूरमनपाकडून दिवसभरात पाच गाळे सील, पाच लाख वसुल

मनपाकडून दिवसभरात पाच गाळे सील, पाच लाख वसुल

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिम ही आयुक्त, बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये सुरु करण्यात आली आहे. दि. ३ जून  रोजी पाचव्या  दिवशी उपायुक्त्त डॉ. पंजाब खानसोळे व मालमत्ता व्यवस्थापक रवि कांबळे यांच्या उपस्थितीत गाळे धारकांवर धडक कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीमध्ये पाच गाळे सील करुन ५ लाख २८ हजार ८९७ रुपये वसुली करण्यात आली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधी मैदान सा.क्रं. १११ व ११२ व्यापारी संकुल येथील पाच  गाळे सील केले व ४ लाख २८ हजार ८९७ रुपयांचे चेक प्राप्त  झाले व १ लाख रुपये नगदी वसुली करण्यात आली आहे.  लातूर शहरातील मनपा मालकीच्या  गाळे धारकांना उपायुक्त, डॉ. पंजाब खानसोळे यांच्या व्दारे आवाहन करण्यात येते की ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळे धारकांनी तात्काळ थकबाकीचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे. व गाळे धारकांनी थकबाकी भरणा न केल्यास अशा गाळे धारकांवर अशीच कार्यवाही सुरु रहाणार  आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR