17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरमनपाचे माजी आयुक्त रमेश पवार यांचे निधन

मनपाचे माजी आयुक्त रमेश पवार यांचे निधन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्तर राहिलेले रमेश पवार यांचे नुकतेच निधन झाले. ३१ ऑगस्ट २०२० मध्ये ते निवृत्त झाले होते. शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, भावंडे, मुलगा व मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
१७ ऑगस्ट १९६२  रोजी जन्म झालेल्या रमेश पवार यांचे शालेय शिक्षण पुणे येथील अभिनव हायस्कूलमध्ये झाले होते. भारती विद्यापीठात अभियांत्रिकी सहप्राध्यापक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होत १९९६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांची मुख्याधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. गोंदिया नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून ते रुजू झाले. तेथे चार वर्ष काम केल्यानंतर लातूर नगरपालिकेत त्यांची बदली झाली. लातूरनंतर ठाणे मनपात उपायुक्त तसेच अहमदनगर मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगर विकास प्राधिकरणमध्ये उपमुख्य अधिकारी, पुणे विभागीय कार्यालयात उपायुक्त्त, नगर प्रशासन कार्यालयात उपसंचालक, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले. पवार यांच्या निधनाबद्दल लातूर मनपातील अधिकारी व कर्मचा-यांनी शोक संवेदना व्यक्त्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR