लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महापालिकेच्या हद्दीतील मोजक्या असणा-या उद्यानांची दुर्वास्था झाली आहे. महानगपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच उद्यानांतील शोभीवंत झाडांच्या ठिकाणी आता काटेरी झुडपे, गवत उगवले आहे. प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांनी उद्यानात जाणेच बंद केले आहे. उद्यानात आता केवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच उनाड पोरांचे सिगारेट झोन ही उद्याने बनली आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शिवाय विकासरत्न विलासराव देशमुख पार्क बाबतही संबंधित ठेकेदार व महापालिकेचा वाद सुरुच आहे. प्रभाग क्र. ५ मधील कोयना रोड येथील सावित्रीबाई फुले उद्यान आयएचएसडीपी उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आले होते.
परंतु, महानगरपालिकेच्या विभागाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत पडले आहे. लातूर शहरातील ग्रीन बेल्टच्या बहुतांश जागेवर अतिक्रमण तर काही ठिकाणचे ग्रीन बेल्ट महापालिकेच्या प्रशासनातील कर्मचा-यांया दुर्लक्षपणाने दुस-यांच्या ताब्यात आहेत. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ते ताब्यात घ्यावेत व तेथे उद्यान विकसित करण्यात यावेत. शहरातील उद्यानाची वेळेत देखभाल आणि दुरुस्ती व्हावी, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने विकास आराखडा तयार करुन जाहिर करण्यात यावा. उद्यानात काम करणा-या कर्मचा-याने वेळेत हजर झाले पाहिजे. उद्यानाच्या देखभालीसाठी रिसायकल पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात यावे.
शहरातील रस्त्यांच्या दुभाजकामध्ये असलेल्या झाडांची निगा राखावी. ज्यात शहरातील उद्यान वेळेत आणि देखभाल आणि दुरुस्ती व्हावी, उद्यान विभागाने कृती आराखडा तयार करुन मनपा कर्मचान्यांना उद्यान विकसित करण्याची जबाबदारी देण्यात यावी. उद्यानातील खेळणी व ओपन जीमची दुरुस्ती वेळेत करावी.उद्यानातील कच-याचा कंपोस्ट खत तयार करुन त्याचा वापर तेथेच करण्यात यावा, अशा विषयाचे निवेदन राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आयुक्त्त यांना डी. उमाकांत यांनी दिले आहे.