25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील किंगमेकरच!

मनोज जरांगे पाटील किंगमेकरच!

 बीड : प्रतिनिधी
   शरद पवार गटाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बजरंग सोनवणे यांच्या बॅनरवर ‘मनोज जरांगे पाटील किंगमेकरच!’असा फोटोसह उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान,  मनोज जरांगे  ८ जूनपासून मराठवाड्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.  बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर मनोज जरांगे पाटलांचा फोटो पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांचा आणि त्यांच्या मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याची जोरदार चर्चा असतानाच, आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील किंगमेकर, असा उल्लेख केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
    खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर यांचाही फोटो बॅनरवर आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बॅनर दुसरे तिसरे कोणी नाही तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी लावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR