35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाबाबत आता नव्याने सुनावणी

मराठा आरक्षणाबाबत आता नव्याने सुनावणी

मराठा आरक्षण कायद्याविरोधात याचिका
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. सरकारी नोक-या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणा-या याचिकांवर पुन्हा सुरुवातीपासून सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना यासंदर्भात विनंती केली होती. तसेच नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचेही हायकोर्टाला साकडे घातले होते. दरम्यान या विनंतीला न्यायमूर्तींकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्याने सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. सोबतच याचिकाकर्त्यांना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्याने अर्ज करण्याचे कोर्टाने निर्देश दिले. दरम्यान, मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधी ज्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली कोर्ट या प्रकरणाची सुनावणी घेत होते, त्याची सुनावणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. जवळजवळ ६० कामकाज पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. यात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद झाला होता तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाल्याने ही सुनावणी पुन्हा नव्या न्यायपीठापुढे होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

सुनावणी पुन्हा लांबणार
मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकांवर नव्याने सुनावणी घेण्यात येणार असल्याने आता दोन्ही बाजूंच्या सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांना नव्याने आपले म्हणणे मांडावे लागेल. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR