23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपविले जीवन

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपविले जीवन

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी ४२ वर्षीय व्यक्तीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील लाडसावंगी येथे घडली. बाबासाहेब जनार्दन पडूळ मृताचे नाव आहे. बाबासाहेब जनार्दन पडूळ हे तालुक्यातील लाडसावंगी येथील रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहेत.

त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, असे नमूद केलेले असल्याचे लाडसावंगी येथील डॉ. पंजाबराव पडोळे यांनी सांगितले. तसेच अल्पभूधारक असलेले बाबासाहेब यांच्या मुलाला ९२ टक्के आहेत. मुलाच्या इंजिनीअरिंगच्या शिक्षणाचा खर्च भरू शकत नसल्याने नैराश्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पडोळे यांनी दिली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR