22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Home‘मविआ’चा तिढा सुटला; दोन उमेदवारांचे अर्ज मागे

‘मविआ’चा तिढा सुटला; दोन उमेदवारांचे अर्ज मागे

विधान परिषद निवडणूक

मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र बुधवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवादाचा अभाव झाल्याचे मान्य केले आणि त्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला. तसंच या मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या दोन्ही उमेदवारांनी काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

एकीकडे, महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा सुटत असताना महायुतीलाही बंडखोरांना शांत करण्यात यश आले. कोकण पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनीमाघार घेतली. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा थेट सामना रंगणार आहे.

काँग्रेस हायकमांड आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्याही दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे आणि नाशिक पदवीधरमधील काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनीही माघार घेतली.

पदवीधरसाठी २२, शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २२ अर्ज दाखल झाले होते. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये १० अर्ज दाखल झाले होते, त्यात उद्धवसेना, शिंदेसेना, भाजपच्या उमेदवारांचा समावेश होता. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज दाखल झाले होते. यात उद्धवसेना, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, अजित पवार गट, काँग्रेस, शिंदेसेनेच्या उमेदवारांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR