16.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमस्साजोग येथे जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर

मस्साजोग येथे जलसमाधी आंदोलनावेळी महिलेला चक्कर

 

बीड : विशेष प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे.

या घटनेला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही आरोपींना पकडण्यात अपयश आल्याने पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आज मस्साजोगच्या गावक-यांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी एका महिलेला चक्कर आल्याने ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. आक्रमक झालेल्या गावक-यांची समजूत काढण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे देखील आंदोलनस्थळी पोहोचले होते.

‘वाल्या कराडला फाशी द्या, फरार आरोपींना अटक करा,’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. दोन तासांहून अधिक काळ गावकरी तलाव्यातील पाण्यात असल्याने पोलीस प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत मस्साजोगमध्ये पोहोचले. गावक-यांनी काँवत यांच्यासमोर आपल्या भावना मांडल्या. २२ दिवस होऊनही तुम्ही अजून आरोपींना पकडलेले नाही. आरोपींना कधी अटक करणार, हे आम्हाला सांगा. तुम्हीच तारीख द्या आणि त्या तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर आम्हाला तरी येऊन गोळ्या घाला, अशा शब्दांत गावक-यांनी आपला रोष व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR