प्रयागराज : वृत्तसंस्था
महाकुंभ मेळ्यात रविवारी दुपारी चारच्या सुमारास सेक्टर १९ मध्ये आग लागली आणि काही वेळातच या आगीने उग्र रूप धारण केले. सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला लागलेल्या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला होता. १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. खलिस्तान जिंदाबाद फोर्सने एक ई-मेल पाठवून दावा केला की, हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे. २३ डिसेंबर रोजी पीलीभीत येथे झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांनी ३ खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटांची जबाबदारी खलिस्तान झिंदाबाद फोर्सने घेतली आहे. या कृत्याचा मुख्य उद्देश कोणालाही दुखावणे नव्हता. हा जोगींना इशारा होता की, खालसा तुमच्या अगदी जवळ आहे या प्रकरणाशी निगडीत खलिस्तानी दहशतवाद्यांचा हस्तक फतेह सिंग बागी हा तरनतारनचा रहिवासी आहे.