30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeराष्ट्रीयमहाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, १५ तंबू जळाले

महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, १५ तंबू जळाले

प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. काही दिवसापूर्वी या मेळामध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले.

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR