23.3 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeसोलापूरमहापालिकेला ४० कोटींचे उत्पन्न वाढण्याची आशा :आशिष लोकरे

महापालिकेला ४० कोटींचे उत्पन्न वाढण्याची आशा :आशिष लोकरे

सोलापूर : शहरातील मिळकतींचा सर्व्हे अद्याप सुरू आहे. गतवर्षी झालेल्या १३ हजार मिळकती वाढल्या. त्यातून उत्पन्नात १८ कोटींची वाढ झाली. यंदा ६० हजार मिळकतींचे उद्दिष्ट ठेवून सर्व्हे सुरू आहे. यातून साधारण ४० कोटींचे उत्पन्न वाढण्याची आशा आहे. असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगीतले.

शहरातील मिळकतीच्या सर्व्हेसाठी कर आकारणी विभागाने स्वतंत्र पथकाद्वारे मिळकतींचा शोध घेतला. वर्षभरात दोन वेळा झालेल्या सर्व्हेतून महापालिकेकडे नोंद नसलेल्या तब्बल १३ हजार मिळकती आढळून आल्या. मिळकतीच्या करातून महापालिकेच्या उत्पन्नात १८ कोटींची वाढ झाली आहे. ६० हजार मिळकतींचा शोध घेण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठीचे सर्वेक्षण सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दर पाच वर्षांनी शहरातील मिळकतीचे सव्हें महापालिकेने करणे बंधनकारक आहे. महासभेत प्रस्तावित असलेल्या मिळकतींच्या
सर्व्हेच्या विषयाला नेहमीच पदाधिकाऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे २० वर्षांपासून शहरातील मिळकतींचे सर्व्हे झाले नाहीत. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या मात्र, झपाट्याने वाढली. मिळकतींच्या सर्व्हेचा विषय प्रशासकाच्या कार्यकाळात मार्गी लागला. तत्कालीन आयुक्त शिवशंकर यांनी शहरातील मिळकतींच्या सब्हेंसाठी पथक नियुक्त केले. त्यानंतर आयुक्त शीतल तेली-उगले यांनी देखील शहरातील सर्व मिळकती, नळ कनेक्शन,ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना, वापर परवाना, कर आकारणी यांचे सर्वेक्षण चालू ठेवले आहे.

या सर्वेक्षणांतर्गत घरोघरी जाऊन पथकाने संबंधित मिळकतदारांला २५ प्रश्न विचारले. त्यामध्ये मिळकत कर नोंद आहे का, बांधकाम परवाना आहे का, वापर परवाना आहे का, नळकनेक्शन आहे का, परवाना व नळाचा वापर घरगुती की व्यावसायिक, ड्रेनेज कनेक्शन आहे का, या संदर्भातली संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांनी गुगल फॉर्मद्वारे जाणून घेतली. गुगल फॉर्मवरील माहितीवरून संगणक विभागाकडून नवीन नोंदी करून घेणे आदी कामे करण्यात आली.

परंतु या सर्वेक्षणापूर्वी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये शहराचा वाढता विस्तार, नूतनीकरण, अनधिकृत बांधकाम यांचा शोध घेतला असता साधारण ९० कोटीचे उत्पक्ष वाढण्याचे उद्दिष्ट होते. या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत झालेल्या सव्र्व्हेच्या माध्यमातून केवळ १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा उद्देश साध्य झाला नसल्याचे दीसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR