निलंगा : प्रतिनिधी
लातूर जहीराबाद निकृष्ट दर्जाच्या बनलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे, तो रस्ता खोदून दर्जेदार दुरुस्ती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केले. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या या परिक्रमेला औराद येथील नागरिकांनी व व्यापा-यांनी भरभरून प्रतिसाद देत १०० टक्के कडकडीत बंद ठेवून महामार्गाच्या परिक्रमेला सर्व बाजारपेठ बंद ठेवून शहरासह परिसरातील व्यापारी व नागरिकांनी बंदला पांिठबा दिला . शनिवार रोज दि. १३ जुलै रोजी निलंगा तालुक्यातील औराद शाहाजानी येथे लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या परिक्रमेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद भांताब्रे, माजी सरपंच मोहनराव भंडारे, राजप्पा वलांडे, बस्वराज वलांडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, तालुका कार्याध्यक्ष अॅड. नारायण सोमवंशी, पंकज शेळके, निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, माजी पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, चंक्रधर शेळके, निटुर सर्कल प्रमुख चेअरमन गंगाधर चव्हाण, आंबुलगा सर्कल प्रमुख विठ्ठल पाटील, दिनकर बिरादार, शेडोळ सर्कल प्रमुख शकील पटेल, मदनसुरी सर्कलप्रमुख अबरार देशमुख, ओबिसी तालुकाध्यक्ष सतीष कोनेरे, औरादचे उपसरपंच महेश मोहनराव भंडारे, बालाजी वामनराव भंडारे, शहराध्यक्ष पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे युवक निलंगा तालुकाध्यक्ष मदन बिरादार, युवक शहराध्यक्ष मुजीब सौदागर, युवक सरचिटणीस अमोल नवटक्के, युवक तालुका उपाध्यक्ष अभिजीत उसनाळे , राम बिरादार, शंकर क्षीरसागर, समीर पठाण, माजी सभापती हाजी सराफ, सचीन सोनी, सलीम पठाण, गोरख नवाडे, राहुल मोरे, रवी गायकवाड, राजु रेड्डी, विलास कांबळे, खमर शेख, शहाजान नाईकवाडे, दाऊद मुल्ला, गफार मोमीन, एजाज मोमीन, बक्सु मुल्ला आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, हमाल मापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके व माजी सरपंच मोहनराव भंडारे यांच्या नेतृत्वाखाली आज निकृष्ट दर्जाच्या झालेल्या राष्ट्रीय लातूर जाहीराबाद महामार्गाच्या परिक्रमेची औराद शहाजानी येथे सांगता झाली. या परिक्रमेला औराद शहाजानी येथील व्यापारी, हमाल, मापाडी, शिक्षक, विद्यार्थी, महिला व परिसरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आडत बाजार, किराणा असोसिएशन, कपडा दुकान, सोनार दुकान, हॉटेल, पानस्टॉल आदीसह सर्व बाजारपेठ १०० टक्के बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला.
निलंगा तालुका काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या पुढाकाराने पानचिंचोली ते औराद शहाजनी येथील लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या सर्व गावात जनजागृती व स्वाक्षरीसह पाठिंबा घेत निटूर व औराद बंदचा १०० टक्के प्रतिसाद घेऊन हायवे परिक्रमेची औराद शहाजानी येथे आज सांगता करण्यात आली. यापुढे आंदोलनाची दिशा हायवेवर जवळपास दीडशे पेक्षा जास्त जीव गमावलेल्या लोकांची यादी व हजारो कायमचे अपंग झालेल्या लोकांची यादी स्वाक्षरी मोहिमेतील सह्यांची यादी खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांना सोबत घेऊन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना हायवे शंभर टक्के दुरुस्त व्हावा यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनासह यादी सुपूर्द करणार व जे या सर्व गोष्टींसाठी जबाबदार आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास कांबळे यांनी केले तर आभार पंकज शेळके यांनी मानले.