22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरमहायुतीचे सरकार लबाड सरकार

महायुतीचे सरकार लबाड सरकार

लातूर :  प्रतिनिधी
विधान निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारखी योजना आणून आम्ही जुगाड केले, असे महायुतीचे आमदार सांगत आहेत. योजना आणून जनतेवर दडपशाही करणे, भीती दाखवणे, कसलाही विचार नसलेले हे महायुतीचे सरकार म्हणजे एक लबाड सरकार आहे, अशी घणाघाती टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. ते लातूर तालुक्यातील गातेगाव, एकुर्गा, ढाकणी या गावांमध्ये संवाद बैठकीमध्ये बोलत होते.
लातूर तालुक्यातील  गातेगाव, एकुर्गा, ढाकणी या गावांमध्ये संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, विलास साखर कारखानचे संचालक गोंिवंद बोराडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील, गातेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन वीरसेन भोसले, अनुप शेळके, श्रीनिवास शेळके,  शिवसेनेचे कैलास पाटील हे उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारखी योजना आणून आम्ही जुगाड केले असे त्यांचे आमदार म्हणतात. योजना आणून जनतेवर  दडपशाही करणे, भीती दाखवणे, कसलाही विचार नसलेले हे महायुतीचे सरकार म्हणजे एक लबाड सरकार आहे. आम्ही शेतक-यांचे खिसे भरण्याचे काम करतो हे खिशाला कात्री लावण्याचे काम करतात.
या पाकीटमारापासून सावध व्हा. जी. एस .टी .आम्ही भरतो कर्ज माफी  उद्योगपतींना दिली जाते. साडे बारा हजार कोटी रुपये उद्योगपतींचे कर्ज सरकारने माप केले. शेतकरी हमीभाव मागतो. हमी भाव मिळत नाही. उद्योग पतींना न मागता कर्ज माफी. महाराष्ट्रात ७०० शेतक-यांंनी आत्महत्या केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 निवडणुकीत एक व्हिजन असले  पाहिजे. आज जे उद्योग लातूरमध्ये आहेत तेथे लातूरचीच मुले कामाला आहेत. आम्ही  शेतक-यांच्या मुलाला ऊस तोडणी यंत्र दिले व त्यांच्या खिशामध्ये ५० लाख रुपये उत्पन्न मिळवून दिले.
साडेचारशे बेरोजगारना मांजरा परिवारांने  रोजगार दिला आहे, असे सांगून आमदार देशमुख म्हणाले की, केंद्र सरकार दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणाले. अकरा वर्षात रोजगार का देऊ शकले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शेतक-याना वीज मोफत म्हटली जाते आणि घरगुती विजेचे दर ३० टक्यांनी वाढविले आहेत. महाविकास आघाडी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारी आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी दलित समाजाच्या खासदारला नीट वागणूक दिली नाही तर सर्व सामान्यांचे  काय? असा प्रश्नही त्यांनी  उपस्थित केला. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत तुकाराम ढवारे, संतोष ढोणे, रामराव ढवारे ,रामंिलग काळे, शंकर देशमुख, जब्बार बागवान, महादेव काळे, शशिकांत भोसले, तुकाराम घोडसे आदी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी  केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR