25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल : यादव

महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल : यादव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात आणि देशात उमटले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महायुती सरकारवर आगपाखड केली.

अखिलेश यादव यांनी या या घटनेची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ही केवळ महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारी घटना आहे. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या अशा कृत्यांना भाजपचे सरकार पाडून उत्तर देईल, असे टीकास्त्र अखिलेश यादव यांनी डागले.

पुतळा उभारण्याशी संबंधित सर्व सरकारी आणि खासगी लोकांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR