23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा खळबळजनक दावा

सातारा : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची पाहणी करत मतदारसंघांची चाचपणी करत आहेत.

तर काही पक्षांत इनकमिंग-आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा करत, महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महाविकासआघाडीला १८० जागा मिळणार
मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, अशा हालचाली सध्या सुरू असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR