17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावे गंडा

महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावे गंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सायबर गुन्हेगार समाजमाध्यमांवर फसवणुकीचे रोज नवनवे फंडे बाहेर काढत असून, यात आता त्यांनी महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यात अनेकांना फटका बसला असला तरीही ते इभ्रत जाईल या भीतीने पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत.

सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली जाहिरात देतात. यात महिलांना गर्भवती करा अन लाखो रुपये मिळवा, असे म्हटलेले असते. यात आपली माहिती गुप्त ठेवण्यासह याचा संपूर्ण खर्च महिलेकडून करण्यात येईल, असे सांगितले जाते.

असा घातला जातो गंडा
– तरुण जाळ्यात अडकले की त्यांना ‘प्रेग्नंट जॉब’चा सर्व खर्च महिला करेल. सर्व वस्तूंची बुकिंग तरुणीकडून होईल, असे सांगितले जाते.
– नोंदणीसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. यानंतर महिलेचा फोटो आणि व्हिडीओ दाखवून बोलणेही करून दिले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR