27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणूक!

महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणूक!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयोग थोड्याच वेळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. याचसोबत उर्वरित १३ राज्यांतही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तसेच ३ लोकसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार आहे.

हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. या दोन राज्यांच्या निवडणुकीसोबतच तीन लोकसभा आणि १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाडची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने ती देखील जागा रिक्त आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या बशीरहाटच्या तृणमूल खासदारांचेही निधन झाले. यामुळे या तिन्ही जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

याचबरोबर १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या १०, राजस्थान ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, पंजाब ४, कर्नाटक ३, केरळ ३, मध्य प्रदेश २, सिक्किम २, गुजरात १, उत्तराखंड १ आणि छत्तीसगडच्या १ जागांवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR