24.6 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeलातूरमहाळंगी शिवारात विज पडून दोघांचा मृत्यू

महाळंगी शिवारात विज पडून दोघांचा मृत्यू

चाकूर : प्रतिनिधी
तालूक्यातील महाळंगी परिसरात वादळी वारा,आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला असून जीवीत हानी आणि आर्थीक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. महाळंगी येथे वीज पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाकूर तालुक्यात रविवारी दि २६ मे रोजी सायंकाळी ४ वादळी वा-यासह पाऊस झाला. या वादळी वा-यांत महाळंगी येथे शिवाजी नारायण गोमचाळे व ओ¸fमकार लक्षमण शिंदे यांचा यांचा वीज पडून.मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे फळबाग व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शिवनखेड बु. येथे झालेल्या वादळी वा-यामुळे प्रभू रामा कोंपले यांची म्हैस अंगावर बाभळीचे झाड पडल्यामुळे मयत झाली. झरी खुर्द येथील तरुण शेतकरी गणेश सूर्यवंशी यांची दोन एकर केळीची बाग चक्रीवादळामुळे भुईसपाट झाली आहे यात अंदाजे १२ लाख रुपयांंचे नुकसान झाले आहे.

अंदाजे १२ ते १३ लाख रुपयांचे नुकसान आहे. झरी खुर्द, महाळंगी ,जानवळ, रामवाडी, रायवाडी, केंद्रेवाडी, शिवनखेड परिसरातील सर्व गावांना अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांनी या घटनेची दखल घेऊन या घटनेसंदर्भात तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करावी यासाठी सूचना केल्या आहेत. तहसीलदार नरसींग जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR