22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरमहाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निदर्शने

महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून निदर्शने

लातूर : प्रतिनिधी
बदलापूर येथे मानवतेला काळिमा फासणा-या लैंगिक अत्याच्याराच्या घटनेमुळे जनतेत असंतोष असून या घटनेच्या निषेधार्थ दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात  आली.
बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिरात दोन विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार केला जातो आणि ही घटना लपविण्याचा प्रयत्न शाळा प्रशासन आणि राजकीय पक्षाकडून केला जात असल्यामुळे त्याचे  तीव्र पडसाद बदलापूर शहरात उमटले. या घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करुन गुन्ह्याचा छडा लावण्याऐवजी या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्टेशनवर झालेल्या आंदोलनातील आंदोलकांना अटक करण्यात महाराष्ट्र शासनाचा कसला आहे पुरुषार्थ आणि सदर घटनेपासून लक्ष विचलित करण्याचा प्रकार हे न समजणारे कोडे आहे. पत्रकारांवर लांछणास्पद पद्धतीची टिप्पणी करणा-याला शासन पाठीशी घालत आहे.
बदलापूर येथिल लैंगिक अत्याचार तसेच देश पातळीवरील सर्व महिला अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी व इतर सर्व घटक पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, रविशंकर जाधव, अ‍ॅड. देविदास बोरुुळे-पाटील, प्रविण सूर्यवंशी, इम्ूा्रान सय्यद, प्रविण कांबळे, आसिफ बागवान, कलीम शेख, प्रा. एम. पी. देशमुख, यशपाल कांबळे, युसूफ बाटलीवाले, अजीज बागवान, तब्रेज तांबोळी, गोविंद देशमुख, अनिल चव्हाण, आयुब मणियार, अ‍ॅड. अंगद गायकवाड, सुलेखा कारेपूरकर, शीतल मोरे, मिनाताई सूर्यवंशी, कमलबाई मिटकरी, नागनाथ डोंंगरे, सिराज शेख, पवनकुमार गायकवाड, फारुक शेख, पिराजी साठे, असलम शेख, विजयकुमार धुमाळ, अभिषेक पतंगे, अमोल गायकवाड, सुंदर पाटील कव्हेकर, नामदेव इगे, हरिभाऊ गायकवाड, पुनीत पाटील, ख्वॉजापाशा शेख, करीम तांबोळी, आकाश मगर, काशिनाथ वाघमारे, युनूस शेख, हमीद बागवान, राहूल डुमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, बख्तावर बागवान, अ‍ॅड. आर. झेड. हाश्मी, जाकेर सय्यद, डी. उमाकांत, बरकत शेख, इब्राहीम शेख, रघुनाथ मदने, शिवसेनेचे सुनील बसपूरे, अ‍ॅड. राहूल मातोळकर, विष्णुपंत साठे आदी सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR