22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरमहिलांचे अर्ज अंगणवाडीसेविकेमार्फत स्वीकारणार

महिलांचे अर्ज अंगणवाडीसेविकेमार्फत स्वीकारणार

जळकोट : प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जळकोट तालुक्यातील सर्व पात्र महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकेमार्फत स्वीकारण्यात येत आहेत तेव्हा आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधून योग्य ती कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित महिला ही २१ ते ६५ वयोगटातील असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तिचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सदरील अटी पूर्ण करण्यासाठी पात्र महिलांना केवळ आधार मतदान कार्ड व रेशन कार्ड जवळ असणे पुरेसे आहे त्यामुळे जास्तीचे कागदपत्रे जुळवण्यासाठी इतर शासकीय विभागामध्ये गर्दी करण्याची अजिबात आवश्कता नाही तसेच केवायसी असलेले आधार संलग्न बँक अकाउंट सोबत सादर करावे जेणेकरून मिळणारा लाभ तात्काळ आपल्या बँक खात्यावर वर्ग होईल.

तालुक्यातील सर्व महिलांनी मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करून ऑफलाईन कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे देणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्या अर्जाची छाननी होऊन पुढील लाभ देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांना अहवाल सादर करता येईल. अंगणवाडी सेविकांना कागदपत्राबद्दल योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे अडचण असल्यास आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेशी महिलांनी संपर्क साधावा आणि लवकरात लवकर आपले अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सादर करावे, असे आवाहन तहसीलदार तथा निवड समितीचे अध्यक्ष सुरेखा स्वामी यांनी सर्व जळकोट तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR