37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरमहिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, गंठण चोरणारे गजाआड

महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र, गंठण चोरणारे गजाआड

लातूर : प्रतिनिधी

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करणयात आली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.

गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करुन त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. दि. १५ डिसेंबर रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवाजी सुभाष घोलप, राहणार जागजी तालुका धाराशिव या आरोपीला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो व त्याच्या सोबत असलेल्या आणखीन काही महिला साथीदाराच्या मदतीने मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, बसमधून चढ-उतार करणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरुन निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

त्यावरुन लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे २ गुन्हे, पोलीस ठाणे गांधीचौक येथील १ गुन्हा, असे दाखल असल्याचे दिसून आले आहेत. आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे ३३.५ ग्रॅम वजनाचे ३ मंगळसूत्रे, गंठण तसेच एक कार असा एकूण २,६५,५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, जमीर शेख, मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, रवी कानगुले, संतोष खांडेकर, सचिन मुंडे, आळणे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR