25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरमहेश नवमीनिमित्त शहरात समाजबांधवांचा उसळला जनसागर

महेश नवमीनिमित्त शहरात समाजबांधवांचा उसळला जनसागर

लातूर : प्रतिनिधी
प्रतिष्ठित आणि शांत समाज म्हणून माहेश्वरी समाजाला ओळखला जातो, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने शनिवार, दि. १५ जून रोजी महेश नवमी विविध कार्यक्रमांनी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात थाटामाटात साजरी करण्यात आली. मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिर ते बालाजी मंदिर काढण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि भव्य शोभायात्रेने लातूरकर मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले. वैशिष्ट्यपूर्ण देखाव्याने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहरात माहेश्वरी समाजबांधवांचा जनसागर उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले.

लातूर शहरात प्रतिवर्षी महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. यावर्षीही शहरात लातूर जिल्हा आणि शहर माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमी निमित्ताने शहरात भव्य अशी श्री भगवान महेश यांची शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर येथून निघालेली शोभायात्रा हनुमान चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, खडक हनुमान, पापविनाश रोडवरून बालाजी मंदीर येथे विसर्जित झाली. या शोभायात्रेत माहेश्वरी ढोलताशा पथक, झ्याकिया सादर करण्यात आल्या.

यावेळी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सी. ए. प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा, कोषाध्यक्ष जगदीश भुतडा, संघटनमंत्री विजयकुमार चांडक, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा उपाध्यक्ष राजकुमार पल्लोड, माहेश्वरी समाज, आखिल भारतीय सदस्य हुकमचंद कलंत्री, बालकिशनजी मुंदडा, उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसूदन सोनी, दीपक भुतडा, प्रदेश कार्य समिती सदस्य राजेश मंत्री, संयुक्त मंत्री गोकुळदास चांडक, राजगोपाल बाहेती, महेश आवास प्रमुख गोविंद कोठारी, सह संघटन मंत्री पुरुषोत्तम कालिया, रामनिवास धुत, महेश सेना अध्यक्ष संतोष तोष्णीवाल, सांस्कृतिक क्रीडा प्रमुख अजय तापडीया, कार्यालय मंत्री चांदकरण लड्डा, आयटी सेल अशोक जाजू, मीडिया व प्रचार मंत्री शाम भट्टड, सह कोषाध्यक्ष प्रल्हाद चांडक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ईश्वर बाहेती, रामेश्वर गिल्डा, गगन मालपाणी, दिलीप सोमाणी, नंदकिशोर सोनी, रामेश्वर भराडीया, शामसुंदर सोनी, बजरंग पल्लोड, भारतलाल धुत आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजातील महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा बालाजी मंदिर येथे आली असता भगवान महेश आरती झाली. त्यानंतर तिकीटधारकांमधून लक्की ड्रॉ काढण्यात येऊन विजेत्यास बक्षीस देण्यात आले.

याप्रसंगी माहेश्वरी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवट धूत परिवाराच्या वतीने आयोजित स्रेहभोजनाने झाली. शोभायात्रेत हजारो माहेश्वरी समाजबांधव उपस्थित होते. कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती, .शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहेश्वरी सभेजेचे अध्यक्ष व पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले, सत्कार करण्यात आले, ब-याच जागी माहेश्वरी बांधवांनी व व्यापा-यांनी, पिण्याचे पाणी, थंड पेय, लस्सी, कुल्फी, सुक्का मेवा आईस्क्रीम, चॉकलेट, आदींची व्यवस्था केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR