22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरमांजरा धरणात ५५.४८ टक्के पाणी साठा

मांजरा धरणात ५५.४८ टक्के पाणी साठा

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरण पाणलोट क्षेत्रातही रविवारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा येवा वाढला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मांजरा धरणातील जीवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.४८ पर्यंत पोहोचली होती. सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या १२ तासांत मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ८.०९ टक्के पाण्याची भर पडली.
मांजरा धरणात सकाळी ६ वाजता पाणीपातळी ६३९.६९ मीटर होती. एकुण पाणीसाठा १३०.९९५ दशलक्ष घनमीटर होता. जीवंत पाणीसाठा ८३.८६५ दशलक्ष घनमीटर एवढा होता. तर जीवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ४७.३९ अशी होती. दुपारी १२ वाजता पाणीपातळी ६४०.०१ मीटर, एकुण पाणीसाठा १३९.७६७ दशलक्ष घनमीटर, जीवंत पाणीसाठा ९२.६३७ दशलक्ष घनमीट तर जीवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५२.३५ होती. सायंकाळी ६ वाजता पाणीपातळी ६४०.२१, एकुण पाणीसाठा १४५.३१ दशलक्ष घनमीटर, जीवंत पाणीसाठा ९८.१८४ दशलक्ष घनमीटर तर जीवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ५५.४८ पर्यत पोहोचली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR