23 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeलातूरमांजरा नदीवरील बराजमध्ये ३६.७ टक्के पाणी

मांजरा नदीवरील बराजमध्ये ३६.७ टक्के पाणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात विशेषत: लातूर तालुक्यासह मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील सलग आणि दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मांजरा नदीवरील १५ पैकी ९ बराजमध्ये ३६.७ टक्के पाणीसाठा झाला आहे. बोरगाव अंजनपुर बंधा-यात मात्र पाणीसाठा निरंक आहे. या १५ बराजचा प्रकल्पीय पााणीसाठा ६४.८४६ दलघमी असून सध्या या बराजेस्मध्ये २३.७९ दलघमी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात मृगाच्या पहिल्या दिवस सातत्याने पाऊस पडला. मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी राहिली. त्यामुळे या नद्यांवरील बराजची शृंखला जलमय झाली आहे. त्यामुळे मांजरा नदीवरील १२ बराजेसमध्ये २३.७९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३६.७ टक्के पाणीसाठा आहे. बजराची शृंखला जलमय झाल्याने मांजरा नदीच्या पात्रात पाणीच पाणी झाले आहे.

लातूर तालुक्यातील बोरगाव अंजनपुर बराजमध्ये सध्या शुन्य टक्के पाणीसाठा आहे., वांजरखेडा बराजमध्ये १.६६६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४६.३ टक्के पाणीसाठा आहे. टाकळगाव देवळा बराजमध्ये ०.७९६ दशलक्ष घनमीटर(४१ टक्के), वांगदरी बराजमध्ये ०.०९८ दशलक्ष घनमीटर (११.६ टक्के), कारसा पोहरेगाव ०४९९ दशलक्ष घनमीटर (१४.६ टक्के), साई बराज ०.०००(०.० टक्के), नागझरी बराज १.४९३ दशलक्ष घनमीटर (४२.८ टक्के), शिवणी बराज ५.१४३ दशलक्ष घनमीटर (५२.४ टक्के), खुलगापुर बराज ३.०८४ दशलक्ष घनमीटर (३१.८ टक्के), बिंदगीहाळ बराज ०.४०९ दशलक्ष घनमीटर (३०.३ टक्के), डोंगरगाव बराज ३.१९४ दशलक्ष घनमीटर (४०.४ टक्के), धनेगाव बराज ५.९२२ दशलक्ष घनमीटर (५३.३ टक्के), होसुर बराज ०.६६० दशलक्ष घनमीटर (२०.३ टक्के) तर भूसणी(तावरजा नदी)बराजमध्ये ०.८२९ दशलक्ष घनमीटर (५५.७ टक्के) एकुण १५ बराजमध्ये २३.७९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३६.७९ टक्के पाणीसाठा आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात आजघडीला ४४.३२६ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या धरणात अद्यापही उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर आहे. मांजरा धरणाच्या खालच्या बाजूस मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने मांजरा नदीवरील बराजची शृंखला जलमय झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR