27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमांजरा प्रकल्पातून सात महिन्यांत १६.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन

मांजरा प्रकल्पातून सात महिन्यांत १६.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन

लातूर : एजाज शेख 
गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाळ्याच्य्साा प्रारंभीच उन्हाची काहिली प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपुर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पाण्याचेही बाष्पीभवन वेगाने होत आहे. जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या सात महिन्यांत मांजरा प्रकल्पातील १६.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे भाष्पीभवन झाले आहे. येणा-या तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असून प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होणार आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा प्रकल्पात २२.५७९ दलघमी पाणीसाठा असला तरी वाढत्या उन्हाने या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत. जुलै-२०२३ मध्ये १.४७१, ऑगस्टाध्ये १.५७०, सप्टेंबरमध्ये १.४६३, ऑक्टोबरमध्ये २.२२९, नोव्हेंबरमध्ये २.२९९, डिसेंबरमध्ये २.१२५ तर जानेवारी २०२४ मध्ये २.२८७ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. गेल्या सात महिन्यांत एकुण १६.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे भाष्पीभवन झाले. गतवर्षी लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी एवढाही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम, १३४ लघू असे एकुण १४४ प्रकल्पांतील पाण्याची पातळी वाढली नव्हती. मांजरा प्रकल्पावर लातूर शहरासह इतर २१ पाणीपुवठा योजना अवलंबुन आहेत. मांजरा प्रकल्पात आजघडीला २२.५७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १२.७६ एवढी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात ७.४९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८.२१ इतकी आहे.
मांजरा व निम्न तेरणा या दोन्ही मोठ्या प्रकल्पांत ३२.४९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १२.११ एवढी आहे. आठ मध्यम प्रकल्पांत १६.२९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १३.३४ इतकी आहे. १३४ लघू प्रकल्पांत ५२.०४५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १६.५६ एवढी आहे. जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत सद्य:स्थित एकुण १००.८३४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची एकुण टक्केवारी १४.३१ एवढी आहे. उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. जुलै-२०२३ ते जानेवारी-२०२४ या सात महिन्यांत मांजरा प्रकल्पातील १६.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यात जानेवारी-२०२४ या महिन्यांत सर्वाधिक पाण्याचे भाष्पीभवन झाल्याची माहिती जलसिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता सूरज निकम यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR