32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. २९ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिका-यांसह  नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील  आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश  बावणे, उपसभापती सुनील  पडीले, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक सचिन बंडापले, माजी नगरसेविका  फर्जाना बागवान, बालासाहेब देशमुख, हमीद बागवान, उद्धव सवासे, सिकंदर पटेल, अंकुश देशमुख, सुशील सवासे, प्रल्हाद रेड्डी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR