लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री समर्थ टेक्स्टाईल कपड्याच्या शोरुमचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील साळे गल्ली भागातल्या साठ फुटी रोडवर उभारण्यात आलेल्या या शोरुम च्या माध्यमातून ग्राहकांकरिता होलसेल आणि रिटेल दरात सुंिटग, साडी,ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी माफक दरात श्री समर्थ टेक्स्टाईलकडुन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.शुभारंभ समारंभा नंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी श्री समर्थ टेक्स्टाईल ची पाहणी केली. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी श्री समर्थ टेक्सटाईलचे चालक मालक प्रा.अविनाश भोसले, सुरेश मंडलापुरे आणि ओमप्रकाश काबरा यांना त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की,निवृत्तीनंतर देखील केवळ आराम न करता सातत्याने कार्यरत राहता यावं या एका वेगळ्या दृष्टीकोणातून तिघा मित्रानी एकत्र येत या व्यवसायाची सुरुवात कौतुकास्पद आहे.
सुरतच्या धर्तीवर या दालनाच्या माध्यमातून लातूरच्या आर्थिक विकासात भर टाकण्यासोबत रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम भविष्यात होईल. आपल्याकडुन उत्तम,प्रामाणिकपणे, आणि ग्राहक समाधानी होतील अशी ग्राहक सेवा मिळेल तसेच आणि व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आपण संधीचे सोने कराल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त्त केली. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को. ऑप.बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल,युनूस मोमीन, अॅड. सुमित खंडागळे, तबरेज तांबोळी, सचिन मस्के, दत्ता लोखंडे, सतीश हलवाई, बालाजी झिपरे, प्रा. अविनाश भोसले, सुरेश मंडलापुरे, ओमप्रकाश काबरा यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.