16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी मानले आभार 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी मानले आभार 

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दि. ५ जून रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी आशाताई श्यामसुंदर शिंदे,  श्याम भोसले, रवींद्र काळे,  विजय देशमुख, अभय साळुंके, अनंतराव देशमुख, धनराज दाताळ, नवनाथ काळे, संतोष नाईकवाडे अभिजीत आपटे, मनोज देशमुख, सुमित भडीकर, भाऊराव भडीकर, अभिजीत भिसे, बालाजी पाटील, सचिन दाताळ, बाळासाहेब जाधव, आकाश जाधव, लक्ष्मण पाटील, मनोहर कराड, अनिल कराड, गोविंद देशमुख, माजी नगरसेविका गीता गौड, श्याम गौड, संजय ओव्हळ, वसंत शिंदे, सुधाकर शिंदे, पंडित अडसुळ, विश्वनाथ राठोड, विशाल कांबळे, लालासाहेब माने, विकास कांबळे, रमाकांत अडसुळ, सय्यद जफार, विनोद वीर, मुरलीधर सोळंके, श्याम नगरचे सरपंच व्यंकट जाधव, उत्तम वीर, संदिपान वीर, वर्षा मस्के, पांडुरंग वीर, शंकरराव बोळंगे, अरुण वीर, रघुनाथ शिंदे, विपिन गवारे आदीसह काँग्रेस, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR