18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रभाग ९ मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रभाग ९ मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील हॉटेल शिवनेरी ते कावेरी हॉस्पिटल रस्त्याचे डांबरीकरण व श्री एजन्सी ते पडिले घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्यांचे काँक्रिटीकरणासह विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात  आले.
यावेळी विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, ट्वेंन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी नगरसेविका सपना किसवे, माजी नगरसेविका रेहाना बासले, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, अमर राजपूत, चाँदपाशा इनामदार, हारुन बासले, मनपा अधिकारी बंडू  किसवे, सुमुख गोविंदपुरकर, कुणाल वागज, आतीक बासले आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित  होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR