30 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना ‘डीएसटीए’चा साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना ‘डीएसटीए’चा साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान

लातूर : प्रतिनिधी 
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन इंडिया पुणे या  संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा २०२४ चा साखर उद्योग गौरव पुरस्कार मांजरा साखर परिवारातील संस्थांचे मार्गदर्शक विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष व रेणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना  पुणे येथील शानदार सोहळ्यात शनिवारी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनर, द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट चे अध्यक्ष एस बी भड, व्हॉईस चेअरमन शिरगावकर, एम के पटेल व्हॉईस चेअरमन (गुजरात) एस डी बोकारे  व्हॉईस चेअरमन ( टेक्निकल) गौरी पवार एकझिक्युटिव्ह सेक्रेटरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी १०० टक्के उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे करुन जो यशस्वी प्रयोग राज्याला दाखवून लातूर पॅटर्न निर्माण केला त्यामुळेच लातूर पॅटर्नचे जनक दिलीपराव देशमुख आपणच आहेत, अशी प्रशंसा त्यांनी करीत आपल्या भाषणात दिलीपराव देशमुख यांचे जाहिर कौतुक केले
माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोर.े,  जागृती शुगरचे सरव्यवस्थापक गणेश येवले, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जीवन देसाई, विलास साखर कारखान्याचे उदगीरचे कार्यकारी संचालक पवार, मारुती महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांच्यासह लातूर येथील मांजरा परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक मान्यवर मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
‘डीएसटीए’चे अध्यक्ष भड यांच्याकडून मांजरा परिवाराची प्रशंसा
यावेळी कार्यक्रमात बोलताना ‘डीएसटीए’चे अध्यक्ष भड यांनी अवर्षनग्रस्त भागात मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात मांजरा साखर परिवारातील १० साखर कारखाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालत आहेत. त्याबद्दल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मनापासुन कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR