लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना नुकताच पुणे येथील डेक्कन टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे इंडिया यांच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा अत्यंत मानाचा प्रतिष्ठित साखर उद्योग गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल औसा तालुक्यातील मातोळा येथील ग्रामस्थांनी गणेश चतुर्थी दिवशी शनिवारी सकाळी आशियाना बंगल्यावर माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचा गणरायाची मूर्ती शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले व ग्रामस्थ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, जिल्हा कॉंग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, मातोळा तंटामुक्त्तीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले, औसा बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भोसले, दत्तात्रय भोसले, संतोष आनंदगावकर, विजय भोसले, शरद भोसले, रमेश कदम, बबन आनंदगावकर, प्रताप भोसले, नेताजी भोसले, काकासाहेब भोसले बाळासाहेब भोसले, अजित भोसले, माजी सरपंच शेषराव गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.